मुंबई विमानतळावर घुसखोरी झालीच कशी? हायकोर्टाचा विमानतळ प्राधिकरणाला सवाल

696

मुंबई  विमानतळाच्या धावपट्टीवर काही दिवसांपूर्वी माथेफिरू तरुणाने घुसखोरी केल्याच्या घटनेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने आज विमानतळ प्राधिकरणाचा चांगलाच समाचार घेतला. विमानतळावर चोख सुरक्षा असताना धावपट्टीवर घुसखोरी झालीच कशी, असा सवाल करीत हायकोर्टाने विमानतळ प्राधिकरणाला खडसावले. एवढेच नव्हे तर याबाबत खुलासा करण्याचे आदेशही दिले.

विमानतळ परिसरातील उंच टॉवरच्या बांधकामामुळे विमानांना धोका निर्माण होऊ शकतो असा दावा करत ऍड. यशवंत शेणॉय यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी ऍड. शेणॉय यांनी माथेफिरू तरुणाने विमानतळवरील कडेकोट सुरक्षा भेदत घुसखोरी केल्याचे खंडपीठाला सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या