हृदयाची धडधड संतुलित करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • गायीच्या दुधात सुकामेवा आणि बदामाचे तुकडे घालून ते आटवून घ्या. मग त्यात थोडी साखर घालून कोमट असतानाच घोट घोट प्या. हृदयाची धडधड थांबेल.
  • दररोज नियमितपणे पिस्त्याचे काही तुकडे खाल तर धडधडणारे हृदय शांत होईल.
  • कांद्याच्या दोन चमचे रसात थोडे सैंधव मीठ घालून ते मिश्रण सकाळ-संध्याकाळ घ्या. फायदा होईल.
  • जेवणानंतर द्राक्षाचा चार चमचे रस दररोज प्या.
  • गुलाबाच्या काही पाकळ्या सुकवून वाटून घ्या. मग त्यात कोथिंबीरीचा रस समप्रमाणात घाला. हे चूर्ण खाऊन त्यावर दूध प्यायल्यास हृदयाची धडधड थांबते.
  • डाळिंबाच्या दाण्यांची चटणी बनवून दररोज सकाळी एकेक चमचा खा. असे आठवडाभर केल्यावर हृदयाच्या धडधडीवर आराम पडेल.
  • बेलाची पाने घेऊन ती थोडी भाजून घ्यायची. मग त्यात थोडे लोणी किंवा मलई मिसळून लगेच खा.
  • सफरचंदाच्या सालासहीत छोटे-छोटे तुकडे करून त्यात अर्धा लिटर पाणी घाला. मग ते पाणी मंद गॅसवर ठेवा. पाणी आटून जेव्हा ते कपभर राहील तेव्हा त्यात थोडी पिठीसाखर घालून ते मिश्रण खा. यामुळे हृदय मजबूत होईल.
  • आवळ्याच्या पूर्णात पिठीसाखर मिसळून दररोज एकेक चमचा जेवणानंतर खाल्ल्यास हृदयाची धडधड थांबेल. यामुळे रक्तदाबावरही लाभ होतो.