चिखली : महाजनारोग्य शिबीराच्या पूर्व तपासणीला ग्रामिण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद

198

सामना प्रतिनिधी ।  चिखली (जि. बुलढाणा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या प्रेरणेतुन व पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. विजय कोठारी यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर जनआरोग्य शिबीराच्या पूर्व तपासणीला ग्रामिण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ११ ऑगष्ट रविवार रात्री चिखली येथे आदर्श विद्यालय परिरारात होणार्‍या महाआरोग्य शिबीराच्या यशस्वितेसाठी भाजपाच्या सर्व आघाडीचे प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते एक दिलाने परिश्रम घेत आहे.

चिखली मतदार संघातील जनतेच्या निरोगी आरोग्यासाठी स्व. भाऊसाहेब फुंडकर जनारोग्य शिबीरांतर्गत पुर्वतपासणीसाठी २९ जुलैपासून चिखली विधानसभा मतदार संघातील वेगवेगळ्या गावात सुरुवात करण्यात आली आहे. ५ ऑगष्ट पर्यंत ११३ गावात ४२५४० रुग्णांनी पुर्वतपासणी करुन घेतली आहे. याला अभुतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. आवश्यकतेनुसार रुग्णांच्या रक्त, लघवी, थुंकी, एक्स-रे, इसिजी व अन्य तपासण्या डॉ. हेडगेवार आयुर्वेद रुग्णालय, चिखली येथे विनामुल्य करण्यात येत आहे. याचाही रुग्णांनी लाभ घेतला आहे. व ही पूर्व तपासणी १० ऑगष्ट पर्यंत चिखली विधानसभा मतदार संघातील सर्व ग्रामिण व शहरी भागात होणार आहे. व ११ ऑगस्ट रोजी चिखलीच्या आदर्श विद्यालयात सकाळी नऊ वाजेपासुन महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये मुंबई, पुणे, संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध १५० डॉक्टरांची चमु त्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर या शिबीरात आपली सेवा देणार आहे. या महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन आदर्श विद्यालय परिसरात सकाळी नऊ वाजता राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थितीमध्ये विदर्ग वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार चैनसुख संचेती, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, खासदार प्रतापराव जाधव, आमदार रामदास आंबटकर, आमदार आकाश फुंडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला बुलढाणा जिल्ह्यातील भाजपाचे सर्व आघाड्यांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी चिखनी मतदार संघात वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करणारे अ‍ॅड. विजयकुमार कोठारी, सतीश गुप्त, रामकृष्णदादा शेटे, प्रेमराज भाला, धृपतराव सावळे, सुरेशअप्पा खबुतरे, श्वेताताई महाले, संजय चेके पाटील, डॉ. प्रतापसिंग राजपूत, पंडीराव देशमुख, सुधाकर काळे, देविदास जाधव पाटील, मंगेश व्यवहारे, नगर अध्यक्ष प्रियाताई बोंद्रे, अरविंदराव असोलकर, शरद माला, सुनिल पोफळे, अ‍ॅड. मोहन पवार, सुरेंद्रप्रसाद पांडे हे परीश्रम घेत आहे. या शिबीरासाठी महाराष्ट्र कौंसिल ऑफ इंडीयन मेडीसीनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, माजी नगर अध्यक्ष सुहास शेटे, डॉ. सौरभ कोठारी यांनी वेगवेगळ्या समित्यांचे गठण केले असून मतदार संघातील प्रत्येक गरजु रुग्णापर्यंत पोहचून हे महाआरोग्य शिबीर यशस्वीकरण्याचा चंग बांधला आहे. या शिबीरामध्ये सर्व नेत्ररोग, हृदयरोग, अस्थीगंग उपचार, मैदृग, बालरोग, स्त्रिरोग, यासोबतच विविध विकारांवर औषधोपचार होणार असुन आवश्यकता भासल्यास पुढील उपचारासाठी रुग्णांला मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती शिबीराचे आयोजक अ‍ॅड. विजयकुमार कोठारी यांनी दिली आहे.

जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महाआरोग्य शिबीर स्थळात बदल
चिखली विधानसभा मतदार संघात प्रत्येक गावात दि. २९ जुलैपासून पूर्वतपासणी शिबीर दररोज सुरु आहे. शिबीराला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता दि. ११ ऑगष्ट रोजी महाआरोग्य शिबीराचे स्थळ मौनिबाबा संस्थान हे बदलून चिखली येथील आदर्श विधालय परिसरात घेण्याचे नियोजन झाले आहे. याची सर्व रुग्णांनी नोंद घ्यावी असेही आयोजन समितीने कळविले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या