हे जीवन सुंदर आहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. पवन सोनार, मानसोपचार तज्ञ

आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्येची बातमी गेल्याच आठकडय़ात आली. हल्ली अशा बातम्या कारंकार येत राहतात. आध्यात्मिक दिग्गज, नाणाकलेले पोलीस अधिकारी ही सर्क आपापल्या क्षेत्रातील मान्यकर मंडळी. सामान्य माणसं यांचा आदर्श समोर ठेकतात. मानसिक उतार-चढाक हा आपल्या जगण्याचा एक भाग आहे. मग सामान्य माणसांना जगण्याचे पाठ देता देता हे मान्यकर स्कतŠ का कमजोर होतात.. मग सामान्यांनी काय करायचे…

जीवन… परमेश्वराने आपल्याला दिलेलं एक अनमोल वरदान… हे जीवन आनंदाने आणि उत्साहाने जगणं एवढं साधं काम आपल्या हातात आहे. पण काहीवेळा आयुष्यात समस्याच अशा उभ्या राहातात जेव्हा जगणं असह्य होऊन जातं. पण… त्यातूनही उभारी घेऊन माणसाने जगलं पाहिजे. हार मानून नव्हे तर मनात उभारी घेऊन… जेव्हा समस्या अधिक मोठी होते आणि त्यापुढे मृत्यूचीही भीती वाटत नाही तेव्हा मग माणूस आत्महत्येला प्रवृत्त होतो. पण नियमित समतोल आहार आणि व्यायाम असेल तर जीवन सुंदर वाटेल. जीवनशैलीही चांगल्या प्रकारची ठेवली तरीही मनात आत्महत्येसारखे विचार येणार नाहीत.

माणसाला नेमकी आत्महत्या करावीशीच का वाटते? याचा विचार केला तर पहिलं कारण दिसतं ते डिप्रेशन, ताणतणाव… हा तणाव सहज दिसून येत नाही. पण मनात काहीतरी शल्य, खंत असते आणि ती वाढत जाऊन जगण्यातला रस निघून जातो आणि मग मनात आत्महत्येसारखे विचार बळावतात. काहीवेळा मोठय़ा आजारपणाला कंटाळूनही लोक आत्महत्या करतात. काही केलं तरी आजार बरा होणार नाही हे कळतं तेव्हा जगणं नकोसं होतं. स्कीजोफ्रेनियासारख्या विकारात तर कानात नको नको ते आवाज ऐकू येतात. भास व्हायला लागतात. ते आवाजच आत्महत्येला प्रवृत्त करतात. आत्महत्या करावीशी वाटण्याला आणखी काही कारणं म्हणजे व्यसन, आर्थिक विवंचना, जॉबलेस होणं… दारू किंवा अमली पदार्थांचे दररोज सेवन करत असल्यास मनात भलभलते विचार येऊ लागतात. त्यामुळे ताणतणाव वाढतो. एखाद्या वेळी मोठे आर्थिक नुकसान झाल्यावरही ‘पुढे काय?’ या प्रश्नाने जीव नकोसा होतो. व्यवसाय नसणं, असलेली चांगली नोकरी सुटणं, त्यात वेगवेगळे मासिक हप्ते असतील तर आता हे हप्ते कसे भरायचे या विवंचनेने त्यापेक्षा जगूच नये असं वाटायला लागतं.

मन प्रसन्न ठेवा

  • काहीही झाले तरी खचून न जाता मनास उभारी मिळेल अशा काताकरणात राहा.
  • घरच्यांना किश्वासात घ्या.
  • कुटुंबाचा मानसिक आधार खूप महत्त्वाचा ठरतो.
  • उत्तम साहित्याचे काचन करा.
  • स्वत:साठी आकरर्जून वेळ काढा. आकडत्या क्यक्तीच्या सहकासात राहा. आकडीचे काम करा.
  • संतुलित आहार आणि क्यायाम हा आनंदी जगण्याचा पाया आहे.
  • आपले छंद जोपासा. ते मनाला उभारी देतात. निसर्गाच्या सान्निध्यात जा.
  • नकारात्मक माणसांपासून, किचारांपासून, काताकरणापासून कटाक्षाने लांब राहा.
  • आपल्या मर्यादा ओळखा. त्याची रास्त जाणीक स्ककीयांनाही करून द्या.
  • स्वत: आनंदी राहा. इतरांना आनंदी करा.
  • आयुष्य एकदाच मिळते. त्याचा भरभरून आस्काद घ्या.
  • इतरांना आपला गैरफायदा घेऊ देऊ नका. त्याची त्यांना स्पष्ट शब्दांत जाणीक करून द्या.
  • स्वत:कर आत्यंतिक किश्वास ठेका.
  • लोक काय म्हणतील याचा किचार करू नका.
  • स्वत:साठी, आपल्या आकडत्या माणसांसाठी जगा.

ही घ्या काळजी…

मन प्रसन्न आणि हेल्दी राहाणं आवश्यक आहे. त्यासाठी मेडिटेशन, विपश्यना नियमित करणं आवश्यक आहे.
योगामध्येही शवासन योग्य प्रकारे आणि नियमित केलं पाहिजे. सहकार्याने राहायला हवे. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्यकडेही लक्ष द्यायला हवे.
आपला जगण्याचा दृष्टीकोन लवचिक असला पाहिजे. तसा तो लवचिक नसेल तर त्यामुळेही त्रास होतो. समतोल आहार घ्यायला हवा.
कुणी चूक केली तरी त्यांना माफ करून पुढे जाण्याची क्षमता आपण वाढवायला हवी. त्यामुळे मनाला त्रास होत नाही.
मनात हा विचार ठेवायचा की जीवनात चांगला काळ आणि वाईट काळ दोन्ही येतातच. आत्ताचा काळ खराब असला तरी दुसऱयाची मदत घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. दुसऱयाचा काळही खराब चालू असेल तर त्यालाही मदतीचा हात द्यायला पाहिजे.

आहारात, व्यायाम हवाच!

मन मजबूत ठेवण्यासाठी जेवढे समतोल आहाराचे महत्त्व असते तेवढाच व्यायामही महत्त्वाचा असतो. आपल्या आहारात नियमितपणे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी असे पिष्टमय पदार्थ, डाळी, मांस, दूध हे प्रथिनेयुक्त पदार्थ असलेच पाहिजेत. भुईमुग, करडई यांसारख्या तेलबियांत स्निग्ध पदार्थांचे प्रमाणही असेल तर उत्तम. त्याबरोबरच सकाळी नियमितपणे केलेला व्यायामही मन सशक्त ठेवायला मदतच करतो. बऱयाचवेळा एखाद्या माणसाची एखाद्या समस्येशी सामना करण्याची क्षमता कमीजास्त असू शकते. त्यामुळे त्या समस्येमुळे ती व्यक्ती दुर्बल आहे असं समजणं बरोबर नाही. त्याऐवजी आपण त्याच्या समस्येकडे लक्ष दिलं, त्याची ती समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला तर बऱयाचदा त्या व्यक्तीच्या मनातून आत्महत्येचा विचार निघून जाईल.