
बऱ्याचदा अनेकांच्या पोटात अचानक गॅस होतो. गॅस होण्यासाठी अन्नाचे पचन, खाण्याच्या सवयी, जेवताना पोटात हवा जाणे, काही आरोग्यविषयक समस्या, पाणी कमी पिणे, फायबरयुक्त पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन न करणे, जेवल्यानंतर लगेच झोपणे यासारखी वेगवेगळी कारणे असू शकतात.
जर पोटात गॅस होत असेल तर सर्वात आधी ज्या पदार्थांमुळे गॅस होतो ते पदार्थ खाणे टाळावे. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे, जेवताना बोलणे टाळावे. नियमित योगा केल्याने गॅस तयार होत नाही. ओवा, जिरे आणि बडीशेप यांचे गरम पाण्यासोबत सेवन केल्यास पोटातील गॅस दूर होतो.