मुंबईमध्ये ‘हेल्थ ऑन व्हील्स’चा शुभारंभ

घरच्या घरी निवडक रक्त चाचण्या करून निदानात्मक सेवा पुरवणारी देशातील अग्रगण्य कंपनी हेल्दियन्सने मुंबईमध्ये आज ‘हेल्थ ऑन व्हील्स’ उपक्रमाचा शुभारंभ केला. अंधेरीतील कल्प निसर्ग सहकारी गृहनिर्माण सोसायटी व त्यापाठोपाठ पाम कॉम्प्लेक्स आणि सर्वोदय लीला येथून या मोफत आरोग्य शिबिरांची सुरुवात झाली. येत्या आठवडय़ांमध्ये अशाच अनेक निवासी संकुलांमध्ये ही शिबिरे घेतली जाणार आहेत. हेल्दियन्सचे संस्थापक आणि सीईओ दीपक साहनी यांनी या सेवेबद्दल सविस्तर माहिती दिली.