Healthy Fruits- या 5 कारणांसाठी किवी हे फळ खायलाच हवे, वाचा

आपल्या प्रत्येकाच्या आहारात फळांचे महत्त्व हे अबाधित आहे. एकेकाळी फारसं प्रचलित नसलेलं किवी हे फळ सध्या आपल्या प्रत्येकाच्या घरात उपलब्ध झालेले आहे. ते फळ म्हणजेच किवी. किवी हे फळ बाजारात आता अगदी सहजसाध्य उपलब्ध झाल्यामुळे, किवी खाण्याचे फायदेही आपल्या लक्षात येऊ लागले आहेत. किवी या फळाची खासियत म्हणजे यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्यामुळे, मधुमेही रुग्ण हे फळ बिनदिक्कतपणे डोळे झाकून खाऊ शकतात. मधुमेहींसाठी किवी हे फळ अगदी योग्य फळ मानले जाते. किवीमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, तसेच या फळामध्ये उच्च फायबर आणि कमी कॅलरीज असतात. त्यामुळेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी योग्य पर्याय मानला जातो.

किवीच्या नियमित सेवनामुळे श्वसनकार्य सुधारते, तसेच दम्याचा त्रासही कमी होतो. किवीमध्ये असलेल्या अ आणि ई या जीवनसत्वांच्या प्रमाणामुळे डोळ्यांच्या आजारांचा धोका कमी होतो. बहुतांशी स्त्रियांमध्ये चाळीशीनंतर हाडांची दुखणी सुरू होतात, यावर किवी हे अतिशय प्रभावी मानलेले आहे. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक पोषक तत्वे असतात. ज्यामुळे हाडांचे आरोग्य निरोगी राखले जाते. म्हणूनच किवीच्या नियमित सेवनामुळे हाडांचे आरोग्य सुधारते. यामुळेच ऑस्टियोपोरोसिसचा धोकाही कमी होण्यास मदत होते.

किवी खाण्याचे 5 महत्त्वाचे फायदे

 

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी किवी या फळाचा आपल्या दैनंदिन आयुष्यात समावेश करणे खूप गरजेचे आहे. किवीमध्ये व्हिटॅमिन सी हे मुबलक प्रमाणात असल्यामुळे, रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

 

किवी हे फळ आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते. किवीमुळे त्वचेला तजेला येण्यास मदत होते. झोप कमी येते अशांसाठी किवी हे औषधापेक्षा कमी नाही. किवीमध्ये असलेल्या सेरोटोनिनमुळे झोप उत्तम लागण्यास मदत होते.

हाडांच्या बळकटीसाठी किवी खाणे हे खूप गरजेचे आहे. किवीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक व्यापक प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते. किवीचे नियमित सेवन केल्यामुळे, आपल्याला उतारवयातील हाडांसंदर्भातील दुखणी कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी ही फळे आहेत वरदान, वाचा सविस्तर

किवी केवळ मधुमेहींसाठीच नाही तर इतरांसाठी सुद्धा पोषक आहे. त्यामुळे मधुमेहींसोबतच इतरही या फळांमध्ये असलेल्या पोषक तत्वांचा लाभ घेऊ शकतात. जाणून घेऊया किवीचे आपल्या आहारातील अनन्यसाधारण महत्त्व.

किवीमध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असते. तसेच अँटीऑक्सिडंट, फाइबर, पोटॅशियम यासारखे पोषक तत्वही किवीत मुबलक प्रमाणात आढळतात. म्हणूनच आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत किवी फळ खाणं सर्वांसाठी खूप गरजेचं झालेलं आहे.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)