
सामना प्रतिनिधी, मुंबई
मराठा आरक्षणाबाबत राज्यभर आंदोलने सुरू असून या हिंसक आंदोलनाची मुंबई उच्च न्यायालयानेही दखल घेतली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. राज्यातील स्थिती पाहता मराठा आरक्षणावर लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका विनोद पाटील यांनी हायकोर्टात केली होती.
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मराठा आरक्षणाचा निर्णय लवकर घेण्यात यावा तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक महिन्यांपासून मागासप्रवर्ग आयोगाकडे प्रलंबित असल्यामुळे सरकारने व आयोगाने मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने लावावा त्याकरिता हायकोर्टाने वेळेची मर्यादा निश्चित करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.



























































