हृदयरोग तज्ज्ञाचा रुग्णाला तपासताना हार्ट अटॅकने मृत्यू

1181

रुग्णाला तपासात असताना एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ. सुरेन चव्हाण असं डॉक्टरांचे नाव आहे. विशेष बाब ही आहे की चव्हाण हे स्वत: हृदयरोग तज्ज्ञ होते. पुण्यातील सहकारनगर भागातील ही घटना आहे. चव्हाण यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिथे दाखल करेपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.

आपली प्रतिक्रिया द्या