
प्लॅस्टिकचे विघटन होत नाही. त्यामुळे ते पर्यावरणाला हानीकारक आहे. मात्र प्लॅस्टिक पर्यावरणाला जेवढे हानीकारक आहे तेवढेच आरोग्यालाही घातक आहे. घरात प्लॅस्टिकचा सततचा वापर म्हणजे धोक्याची घंटा आहे. प्लॅस्टिकमधील रसायनामुळे मृत्यूही ओढावतो.
प्लॅस्टिक रसायनांच्या संपका&मुळे 2018 साली हिंदुस्थानात एक लाखाहून अधिक मृत्यू हृदयविकाराने झाल्याची धक्कादायक बाब ‘लॅन्सेट’च्या अहवालातून समोर आलेय.
‘लॅन्सेट’च्या नव्या अहवालात, प्लॅस्टिकमधील केमिकल आणि हृदयविकाराचा संबंध आढळून आला. संशोधनात डीईएचपी (डाय-2-इथिलहेक्साइल फॅथलेट) नावाच्या रसायनावर लक्ष पेंद्रित करण्यात आले, ज्याचा वापर अन्न कंटेनर, पाईप्स, सौंदर्यप्रसाधने, बग स्प्रे आणि अगदी वैद्यकीय उपकरणे यासारख्या उत्पादनांमध्ये प्लॅस्टिक मऊ आणि लवचिक बनवण्यासाठी केला जातो.
डीईएचपी रसायनामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱया धमन्यांना सूज येऊन कालांतराने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येऊ शकतो. अमेरिकेतील एनवाययू लँगोन हेल्थच्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील टीमने लेन्सेट अहवाल प्रकाशित केला. प्लॅस्टिकची समस्या केवळ विघटनापुरती मर्यादित नाही. तर प्लॅस्टिकच्या माध्यमातून हवा, पाणी आणि अन्नामध्ये घातक रसायने सोडली जातात. त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. या रसायनामुळे हृदयविकार, मधुमेह, पॅन्सर आणि श्वसनाशी संबंधित आजार जडतो.
जगभरात 3.56 लाख मृत्यू
घरगुती प्लॅस्टिकच्या वस्तूंमध्ये आढळणारी रसायनांचा संबंध जगभरात एकाच वर्षात हृदयरोगामुळे होणार्या 3.5 लाखांहून अधिक मृत्यू होत असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. संशोधकांच्या टीमने 200 देशांमधून युरीन सॅम्पल गोळा केले तसेच आरोग्य सर्वेक्षण केले. त्यात असे आढळून आले की, 2018 साली ज्या डीईएचपी या केमिकलशी संपर्प आलेल्या 3.56 लाख लोकांचा मृत्यू हृदयविकाराशी संबंधित आजारांनी झाला. या मृतांचा वयोगट 55 ते 64 होता. हिंदुस्थानात 1,03,587 म्हणजेच जास्त मृत्यूची नोंद झाली. त्याखालोखाल इंडोनेशियात 52,219 आणि चीनमध्ये 33,858 मृत्यू झाले.