
बीड शहरासह जिल्हाभरात बुधवारी दुपारनंतर धुवांधार पावसाला सुरुवात झाली. या वर्षात पहिल्यांदाच पाऊस मनसोक्त बरसला.
हवामान खात्याने बुधवारी बीड जिल्ह्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. सकाळपासून सूर्यदर्शन झाले नाही. दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. बीड शहरासह जिल्हाभरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये धोंडे समाधान व्यक्त होत आहे.





























































