
गेल्या दोन दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने मोदी सरकारच्या विकासकामांचे पितळ उघडे पाडले आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या नव्या संसद भवनाच्या परिसराला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. संसदेच्या परिसरात साचलेल्या पाण्याचा व्हिडिओ काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यातून संसदेच्या परिसरात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्ली-एनसीआर परिसरात सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. एम्स उड्डाणपूल, कनॉट प्लेस, आर. के. पुरम इत्यादी परिसरात अनेक ठिकाणी ३ ते ४ फूट पाणी साचले आहे. काँग्रेसने सोशल मीडियावर संसदेच्या आवारातील व्हिडिओ पोस्ट केला आहे. “नवी संसद पाहा, मोदींनी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून ती बांधली आहे,” असा टोला या पोस्टमध्ये काँग्रेसने लगावला आहे.






























































