अंबरनाथ-बदलापूरमध्ये मुसळधार, रविवारची सकाळ पाण्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rain-12

सामना ऑनलाईन । अंबरनाथ

गेल्या आठवड्यात मुंबई-ठाणे-वसर्ई-विरारला धूऊन काढल्यानंतर छोटा ब्रेक घेतलेल्या पावसानं पुन्हा जोर दाखवून देण्यास सुरुवात केली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ-बदलापूर-उल्हासनगर भागात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं अक्षरश: कहर केला आहे. संततधार पावसामुळे नागरिकांनाची रविवारची सकाळ पाण्यात गेली आहे.

शनिवारी सकाळी काही काळ सूर्य नारायणाचं दर्शन झाल्यानं थोडी हायसं वाटतं होतं. मात्र दुपारी पुन्हा पावसाच्या सरी सुरू झाल्या. रात्रीपासून मात्र पावसाचा जोर वाढला. दरम्यान, सुट्टीचा दिवस असल्यानं नोकरदार वर्गाचे हाल मात्र झाले नाही.