भोकरदन तालुक्यातील शेतकरी करतोय अस्मानी संकटांशी सामना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोकरदन तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून पावसामुळे कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग, तीळ, मका या पिकाचे फार मोठे नुकसान झाले  आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. तालुक्यातील अनेक गोरगरीब गावकर्‍यांची शेतकरी बांधवांची संततधार पावसामुळे अनेकांचे घर कोसळले असून त्यांचेही पंचनामे होणे गरजेचे आहे. अनेक ग्रामस्थ व गावकरी आपल्या घर पडल्याने व भिंती पडल्याने उघड्यावरती संसार थाटून जगत आहे. याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने शेतकरी मात्र अस्मानी संकटात सापडलेला असून तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.

अनेक वेळी दुष्काळाचा सामना करत असताना यावर्षी मात्र ओल्या दुष्काळाचा सामना संबंध भोकरदन तालुक्यातील शेतकरी बां धवांना करावा लागत आहे. आज रोजी देखील महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली नसून अनेक शेतकरी तोंडाशी आलेला घास पाहून निराशाजनक अवस्थेमध्ये जगत आहे.

ओल्या दुष्काळाचा सामना करणार्‍या शेतकरी राज्याच्या व सर्जा-राजाच्या मुखाशी घालणारा घास देखील या ठिकाणी काळा पडलेला असून मुक्या प्राण्याला सुद्धा या ठिकाणी तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. तेव्हा यासाठी सुद्धा प्रशासनाने मुक्या जनावरांना चारा छावण्या उभाराव्या अशी मागणीही शेतकर्‍यांनी केली आहे.