
कोल्हापूरमध्ये सोमवारी मध्यरात्री पासुन जिल्ह्यात कोसळणाऱ्या धुवांधार पावसाने, जनजीवन विस्कळित केले आहे. बुधवारी सकाळी आठपर्यंतच्या चोवीस तासांतच पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत तब्बल नऊ फुटांची तर सायंकाळ पर्यंत आणखी दोन फुटांची वाढ होऊन,हि पातळी 24.10 फुट झाली होती. त्यामुळे नदीचे पाणी पात्रालगत आले होते आणि वीस बंधारे पाण्याखाली गेले होते.यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
दरम्यान आज पहाटे पासुन पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणक्षेत्रात पावसाचा जोर सुरुच होता. तर सायंकाळपर्यंत वीस बंधारे पाण्याखाली गेले होते. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 139 मिमि पावसाची नोंद झाली आहे.
पंचगंगा नदीची कसबा बावडा येथील राजाराम बंधार्याची गुरूवारी सकाळी 8 वाजता 13.9 फुटांवर असलेली पाणीपातळी संततधार आणि धुवांधार पावसाने काल सायंकाळी 6 च्या सुमारास 17 फुटांवर गेली होती.तर आज सकाळी आठच्या नोंदीनुसार या पातळीत रातोरात पाच फुटांची वाढ होऊन,ती 22.7 फुट झाली होती. तर आणखी 11 बंधारे पाण्याखाली गेल्याने,पंचगंगा नदीवरील-शिंगणापूर,राजाराम, सुर्वे,रुई,इचलकरंजी,तेरवाड व शिरोळ.भोगावती नदीवरील-हळदी,राशिवडे,सरकारी कोगे,खडक कोगे. कासारी नदीवरील-यवलूज.तुळशी नदी वरील- बीड.वेदगंगा नदीवरील- कुरणी,सुरूपली, बस्तवडे व चिखली असे एकूण 17 बंधारे पाण्याखाली आहेत.त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सायंकाळी सातच्या सुमारास पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत दोन फुटाने वाढ होऊन, ही पातळी 24.10 फुट झाली होती.तर वीस बंधारे पाण्याखाली गेले होते.




























































