मोखाडय़ात ‘छप्पर फाडके’ पाऊस; मोरचोंडी पुलाजवळील रस्ता वाहून गेला, तोरंगण घाटात दरड

23

सामना प्रतिनिधी । मोखाडा

दोन दिवस पडत असलेल्या ‘छप्पर फाडके’ पावसामुळे मोखाडावासीयांची अक्षरशः बोबडी वळली आहे. पावसाच्या ‘खोडा’मुळे दैनंदिन व्यवहारच ठप्प झाला असून मोरचोंडी पुलाजवळील रस्ताच वाहून गेला आहे. त्यामुळे मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्ग बंद झाला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर तोरंगण घाटात दरडी तसेच झाडे कोसळल्याने तेथील वाहतूकही बंद पडली आहे. अनेक घरे व शाळांमध्ये पाणी शिरल्याने एक धावपळ उडाली. विद्यार्थ्यांना सक्तीची सुट्टी घ्यावी लागली. दरम्यान पावसाचा जोर कमी न झाल्यास मोखाडा तालुक्यात पुराचे संकट आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

धबधब्यात तरुणी बुडाली
कर्जत: कॉलेजच्या नावाने कर्जतच्या टपालवाडी धबधब्यावर आपल्या मित्रांसोबत वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या कल्याणच्या तरुणीला जीव गमवावा लागला आहे. संजना शर्मा (17) असे या तरुणीचे नाव असून कोसळणारे झरे आणि डोहाच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून तिचा मृत्यू झाल्याची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कल्याणच्या नांदिवली परिसरात राहणारी संजना शर्मा ही नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली. मात्र कॉलेजला न जाता ती सकाळी 8 च्या सुमारास ती आपल्या मित्रांसह थेट नेरळ येथे दाखल झाली. नेरळ येथून टपालकाडीच्या धबधब्याकर ते कर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी पोहोचले. रात्रीपासून पाऊस जोरदार सुरू असल्याने धबधब्याच्या पाण्याचा जोर बराच होता. धबधब्याकर हा आनंद घेत असताना अचानक पाय घसरून संजना खाली घसरत गेली. अचानक कोसळल्यामुळे डोक्याला दगडाचा जोरदार फटका बसला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.

बदलापुरात तरुण बुडाला
वांगणी येथील गाव तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. भरत घायाळ (38) असे इसमाचे नाव असून तो बदलापूर येथील रहिवासी होता.

आपली प्रतिक्रिया द्या