शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरात जोरदार पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर तालुक्याच्या बेट भागातील टाकळी हाजी परिसरात पहिलाच जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सोमवारी सायंकाळी 5 ते 5 वाजण्याच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसाने तालुक्याला जोरदार तडाखा दिला. पावसाचा जोर जास्त होता. टाकळी हाजी, म्हसे बुद्रुक, माळवाडी या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. झालेल्या पावसाने नागरिकांची असह्य उकड्यातून सुटका झाली तर शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठीच धांदल उडाली.

विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह झालेला पाऊस एकंदरीतच समाधानकारक आहे. अशाच प्रकारे आणखी पावसाची नितांत गरज असून परिसरात आटलेले पाणवठे, तळागाळाला गेलेल्या विहिरीत पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीस लागतील, असे बळीराजा शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष जयवंतराव भाकरे यांनी सांगितले.