उंच लोकांना कोरोनाचा अधिक धोका; संशोधकांचा नवा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरामध्ये कोरोनाचा  प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाचा संसर्ग  रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी शक्य ते सर्व उपाय अंमलात आणले आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने काही आठकडय़ांपूर्वी हवेमधूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो यासंदर्भातील संशोधनामध्ये सत्यता असल्याचे सांगितल्यानंतर कोरोनाबाबतची भिती आणखीनच वाढली आहे. त्यातच आता युनायटेड किंग्डम, नॉर्वे आणि अमेरिकेतील संशोधकांनी उंची जास्त असणाऱ्या व्यक्तींना करोनाचा धोका अधिक असल्याचेही म्हटले आहे.