
केदारनाथ धामला निघालेल्या हेलिकॉप्टरचे आज उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाडानंतर उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिह्यातील महामार्गावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टरने बदासू बेसवरून केदारनाथसाठी उड्डाण केले होते. सुदैवाने पायलटसह सहा जण थोडक्यात बचावले. लँडिंगच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये असलेले काही प्रवासी सुरक्षित आहेत. तर पायलटला किरकोळ दुखापत झाली. हे हेलिकॉप्टर व्रेस्टेल एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे आहे.





























































