
जेवण अधिक स्वादिष्ट आणि चवदार करण्यासाठी काही युक्त्यांचा वापर करतात. पण, या कोणत्या ट्रिक्स असतात. किंवा कोणत्या वेळी कोणती ट्रिक वापरली पाहिजे, हे ऐनवेळी आपल्याला सुचत नाही. काही खास उपयुक्त टिप्स वापरून जेवण अधिक चविष्ट आणि स्वादिष्ट तयार करु शकता.
पालकची भाजी चविष्ट करण्यासाठी भाजीला उकळी आल्यानंतर त्यात मीठ घालावे. यामुळे पालक अधिक चविष्ट होते.
रायत्यात मीठ असे घालावे
काही लोक रायते तयार करताना त्यात मीठ घालतात. परंतु, रायत तयार करताना त्यात मीठ घातले तर ते आंबट लागते. त्यामुळे रायत्याला अगोदर मीठ घालणे टाळावे आणि सर्व्ह करताना मिठाचा वापर करावा.
इडली मऊ आणि खुसखुशीत कशी होईल?
तुम्ही घरी दक्षिण भारतीय पदार्थ करत असाल आणि त्यात इडली तयार करत असाल. आणि तुम्हाला खुसखुशीत आणि मऊ इडलीचा आनंद घ्यायचा असेल तर इडलीच्या पिठात थोडासा साबुदाणा आणि उडीद डाळ घालून तुम्ही मऊ आणि लुसलुशीत इडली तयार करु शकता.
यामुळे हरभऱ्याला दुर्गंधी येणार नाही
अनेकदा भिजवलेल्या हरभऱ्याला दुर्गंधी येते. त्यामुळे ते खाणे नकोसे वाटते. पण, हरभऱ्याला दुर्गंधी येऊ नये यासाठी मिश्रणात कोंब फुटल्यानंतर बारीक कापडात बांधून फ्रिजमध्ये ठेवल्यास वास नाहीसा होण्यास मदत होते.
मिरची होणार नाही खराब
मिरची खराब होऊ नये म्हणून त्यात थोडी हिंग ठेवू शकता, असे केल्याने मिरची बराच काळ व्यवस्थित टिकते. दुसरीकडे हिरव्या मिरच्यांचे देठ तोडून फ्रिजमध्ये ठेवल्याने मिरच्या लवकर खराब होत नाही.
साखरेत मुंग्या पडणार नाही
साखरेत मुंग्या येण्याची समस्या काही वेगळी नाही. अनेक जणांनी अनुभव घेतला आहे की, काही केले तरी साखरेच्या डब्यात मुंग्या येतात. अशावेळी त्यात २-४ लवंग घातल्यास मुंग्या येणार नाहीत.
बटाट्याच्या पराठ्याची चव वाढवा
बटाट्याचे पराठे चवदार करण्यासाठी त्यात कसुरी मेथीचा समावेश करावा. यामुळे पराठे अधिक चविष्ट लागण्यास मदत होते.
भातामध्ये अळी पडणार नाही
अनेकदा तांदूळ अनेक दिवस ठेवल्यास त्याय किडे होतात. हे किडे दूर करण्यासाठी तांदळाच्या डब्यात थोडे मीठ घालावे. यामुळे तांदळात किड पडणार नाही.
मेथीचा कडूपणा
मेथीचा कडूपणा दूर करण्यासाठी त्यात थोडे मीठ टाकून थोडावेळ ठेवा.
भेंडीचा चिकटपणा
अनेकदा भेंडी चिरताना त्याचा चिकटपणा आपल्याला सतत सतावत असतो. अशावेळी ते चिरताना चाकूला थोडासा लिंबाचा रस लावा. जेणेकरुन तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही.

























































