फोर्टच्या ‘हेरिटेज’ला मिळणार नवा साज!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

विदेशी लूकचे फुटपाथ, ट्रान्सफ्रंट बसस्टॉप, चकाचक रस्ते आणि अत्याधुनिक लायटिंगमुळे फोर्ट परिसरातील हेरिटेज वास्तूंना नवा साज मिळणार आहे. यामध्ये पुरातन वास्तूंचा इतिहासही उलगडला जाणार आहे. पालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या या कामाचा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे.

फोर्ट परिसरात पालिका मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारख्या हेरिटेज वास्तू देशविदेशातील पर्यटकांचे खास आकर्षण आहे. अप्रतिम वास्तूकला आणि ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या दक्षिण मुंबईतील या इमारतींना युनिस्कोने नुकताच ‘हेरिटेज’ दर्जा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने फोर्ट परिसरातील पुरातन वास्तूंचा परिसर सुशोभित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यामध्ये पालिका मुख्यालयाची इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुशोभित करण्यात येणार असल्याचे पुरातन वास्तू व जतन विभागाचे वरिष्ठ अभियंता संजय सावंत यांनी सांगितले.

परिसर होणार अतिक्रमणमुक्त

सुशोभीकणाच्या कामात फोर्ट परिसरातील सर्व स्टॉल्स, फेरीवाले हटवण्यात येणार असून २४ तास स्वच्छता राखली जाणार आहे. विदेशी धर्तीवर फुटपाथ बनवण्यात येणार आहेत. जुने झालेले लाइटचे सर्व खांब हेरिटेज धर्तीवर बसवण्यात येणार आहेत. याशिवाय गर्दीच्या नियोजनासाठीदेखील उपाययोजना करण्यात येणार आहेत.

असे होणार सुशोभीकरण

  •  टर्मिनससमोरील बेकायदा स्टॉल आणि बाकडे हटकिणार.
  •  बसस्टॉपचे नूतनीकरण होणार.
  •  हेरिटेज वास्तूंच्या माहितीचे फलक लावणार.
  •  पदपथाकर एकाच प्रकारच्या लाद्या लाकणार.
  •  कुलाबा-फोर्ट परिसराचा संपूर्ण नकाशा लाकण्यात येणार आहे. यात हेरिटेज स्थळे प्रामुख्याने दाखकिण्यात येणार आहेत.
  •  टूरिस्ट फ्रेंडली आणि पादचारी फ्रेंडली परिसर बनकिण्यात येणार.