लष्कराचे मिशन चिता, चीनच्या हालचालींवर ‘हेरॉन’ची नजर

437

चीनने सीमाभागात सुरू केलेल्या कुरापतींना आळा घालण्यासाठी लष्कराने आपले प्रलंबित मिशन चिता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत इस्रायलकडून घेण्यात आलेली 90 हेरॉन ड्रोन अधिक सक्षम करण्यात येणार आहेत.

लेझर गाइड बॉम्ब वाहून नेणाऱ्या या ड्रोनमध्ये आता एण्टिटँक मिसाइल काहून नेण्याची क्षमता निर्माण करण्यात येत आहे. हे मिसाईल शत्रूच्या हद्दीत नजर ठेकून केळ पडल्यास या मिसाइलद्वारे त्यांच्या कारवाया उद्ध्वस्त करणार आहे. त्यामुळे सुमारे 3500 कोटींच्या या प्रस्तावाबाबत संरक्षण मंत्रालय गांभीर्याने विचार करीत आहे. संरक्षण विभागाकडे देण्यात आलेल्या प्रस्तावानुसार तिन्ही सैन्य दलांनी शत्रूवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा अधिकाधिक वापर करण्यास सांगितले आहे.

10 किमी उंचीवरून हालचालींवर नजर

मागील काही वर्षांपासून लष्कराने हेरॉन ड्रोनचा वापर वाढवला आहे.  हे ड्रोन 10 किमी उंचीवर उडू शकते. तिथून शत्रूच्या प्रत्येक हालचालींवर  या ड्रोनची करडी नजर असते. आता बॉम्ब आणि मिसाइलची जोड मिळाल्याने हे लष्कराच्या ताब्यातील एक प्रभावी अस्त्र ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या