
पीओपीच्या मूर्तींमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे अशा मूर्तींच्या प्रतीकात्मक विसर्जनाला याचिकाकर्त्यांनी विरोध दर्शवताच मुंबई उच्च न्यायालयाने यावरून याचिकाकर्त्यांना आज सुनावले. “धर्मशास्त्रात केवळ पीओपीच्या मूर्तींचेच विसर्जन केले जाईल, असे कुठे लिखित स्वरूपात नमूद आहे?” असा सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना विचारला.
पीओपीच्या वापराविरोधात तसेच समर्थनासाठी उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आज न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी मूर्तिकारांच्या वतीने ज्येष्ठ वकील संजीव गोरवाडकर यांनी पीओपीच्या उत्पादन आणि वापराबाबतची आकडेवारी कोर्टासमोर मांडली.





























































