हायकोर्टाचा ईडीला दणका, अविनाश भोसलेंच्या मालमत्ता जप्तीचा आदेश रद्द

कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पुण्यातील बिल्डर-हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या मालमत्तेवर टाच आणणाऱया ईडीला हायकोर्टाने दणका दिला आहे. न्यायालयाने पुण्याच्या एबीआयएल हाऊस जप्तीचा आदेश रद्द केला आहे.

येस बँक आणि डीएचएफएल कथित गैरव्यवहार प्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. 7 ऑगस्ट 2021 रोजी ईडीने पुण्याच्या गणेशखिंड रस्त्यावरील रेंज हिल्स कॉर्नर येथील एबीआयएल हाऊसवर जप्तीची कारवाई केली होती. याशिवाय आरा प्रॉपर्टीजवरही कारवाई करण्यात आली होती. विशेष पीएमएलए न्यायालयाने 16 डिसेंबर 2022 आणि 12 एप्रिल 2023 रोजी अविनाश भोसले व आरा प्रॉपर्टीज यांच्यासह सर्व आरोपींना निर्दोष सोडले होते त्यानंतर हायकोर्टाने जप्तीचा आदेश रद्द केला.