हेरिटेज कबूतरखाने तूर्तास तोडू नका, न्यायालयाचे पालिकेला आदेश

दादरच्या कबूतर खान्याचा वाद हायकोर्टात पोहोचला आहे. कबूतरांना खायला घालण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली असून न्यायालयाने मात्र सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट करत तूर्तास याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. मात्र पुढील आदेशापर्यंत हेरिटेज कबूतरखाने जमीनदोस्त करू नयेत असे निर्देश न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने पालिकेला दिले आहेत.

कबूतरांच्या विष्ठsमुळे आणि पिसांमुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे कारण देत पालिकेला शहरातील कबूतरखाना बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले होते. मात्र कबूतरांना खायला घालण्यास बंदी घातल्याने त्यांचा मृत्यू होत असल्याने खाद्य घालण्यापासून रोखू नये अशी मागणी करत पल्लवी पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.