इंदूरमध्ये नीट युजी पुन्हा नाही

नीट युजी परीक्षा सुरू असताना वीज गेली. त्यामुळे पेपर देण्यात अनेक अडचणी आल्याचे सांगत 75 हून अधिक विद्यार्थ्यांनी इंदूर हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. परंतु, हायकोर्टाने पुन्हा परीक्षा घेण्यासंबंधीची विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली आहे.