शत्रुघ्न सिन्हा यांना हायकोर्टाचा दिलासा; नाव, आवाज आणि फोटो परवानगीशिवाय वापरता येणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या नावाचा, आवाजाचा, फोटोचा आणि ‘खामोश’ या डायलॉगचा परवानगीशिवाय वापर करता येणार नाही. ‘खामोश’ हा शब्द आणि शत्रुघ्न सिन्हा यांची शैली हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या संमतीशिवाय याचा वापर करणे बेकायदेशीर असल्याचे न्यायालय म्हणाले.

सोशल मीडिया, ई-कॉमर्स वेबसाईट आणि एआय टूल्सद्वारे त्यांच्या नावाचा प्रतिमेचा आणि ‘खामोश’ या डायलॉगचा गैरवापर केला जात असल्याप्रकरणी शत्रुघ्न सिन्हा यांनी याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.