
शिंदे गटाचे नाशिकचे आमदार सुहास कांदे यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला या आरोपात तथ्य असल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने देवेंद्र कांदे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
ही घटना 2017 मध्ये घडली आहे. याचा गुन्हा आठ वर्षांनी नोंदवला आहे. हा गुन्हा वैयक्तिक वादातून नोंदवला गेला आहे या दाव्यात तथ्य आहे. आता याच्या चौकशीसाठी कोठडीची आवश्यकता नाही, असेही न्या. माधव जामदार यांनी नमूद केले.
सुहास कांदे यांचा युक्तिवाद
– बनावट कागदपत्रे सादर करून पंत्राटदाराचा परवाना घेण्यात आला आहे. हा गुन्हा गंभीर आहे. त्यामुळे देवेंद्र कांदेला अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद आमदार सुहास कांदेंनी केला होता. तो न्यायालयाने अमान्य केला.
देवेंद्र कांदे यांना अटकपूर्व जामीन
– देवेंद्र कांदे यांनी ही याचिका केली होती. त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पंत्राटदाराचा परवाना घेताना त्यांनी बनावट कागदपत्रे सादर केली, असा त्यांच्यावर आरोप आहे. यात अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. न्यायालयाने कांदे यांना एक लाखाचा जामीन मंजूर केला.
– माझ्या वडिलांनी आमदार सुहास कांदे यांच्या भावाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याच रागातून आमदार कांदे यांनी माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला, असा दावा देवेंद्र कांदे यांनी केला.



























































