30 जूनपासून समुद्र खवळण्याची शक्यता; सतर्कतेचा इशारा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

पावसाचा जोर वाढताच समुद्र खवळतो. उग्र रूप धारण करतो. यंदाही 30 जूनपासून पावसाळ्यात समुद्राला उधाण येणार आहे. उधाणाच्यावेळी समुद्राच्या उंच लाटा अनुभवण्यासाठी अनेकजण किनाऱ्यावर गर्दी करतात. पावसाळयात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात काही दिवशी समुद्राला उधाण येणार असून अडीच मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.याकाळात किनारपट्टीशेजारी रहाणाऱ्या नागरिकांना खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हयातील समुद्रकिनाऱ्याला भरतीमुळे उसळणाऱ्या या लाटांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. बाणकोट समुद्रकिनारी 05 जुलै रोजी दुपारी 01.36 वा., 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12.55 वाजता, हर्णे येथे 04 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता, 03ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता, 31 ऑगस्ट रोजी दुपारी 11.45 वाजता, दाभोळ येथे 04 जुलै रोजी दुपारी 12.42 वाजता, 03 ऑगस्ट रोजी दुपारी 12.23, रत्नागिरी येथे 04 जुलै रोजी दुपारी 12.37 वाजता, 15 जुलै रोजी दुपारी 01.01 वाजता, 03 ऑगस्ट रोजी रात्री 00.56 वाजता, 31 ऑगस्ट रोजी रात्री 23.59 वाजता मोठ्या लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.