
अनेक घरांमध्ये मुले एक मिनिटही मोबाईल सोडत नाहीत. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांचे हे व्यसन दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. यावर काही उपाय करता येतील.
मुलांना 2 ते 5 वर्षांपर्यंत स्क्रीन टाइम एक तासासाठी असला पाहिजे. 6 वर्षांपेक्षा मोठय़ा मुलांना स्क्रिन टाइम आई-वडील आपल्या हिशोबाने सेट करू शकतात.
मुलांना जितके होईल तितके मैदानी खेळ किंवा पार्कमध्ये फिरण्यासाठी प्रोत्साहित करा. मित्रांबरोबर फिरायला जाण्यासाठी प्रोत्साहित करा. पोहायला प्रोत्साहित करा.
मुलं बहुतेक फक्त त्यांच्या मनोरंजनासाठी मोबाईल वापरतात. मोबाईलशिवाय इतर मनोरंजनाचे पर्याय निवडा. जसे की, पुस्तक वाचा, गाणी ऐका, चित्र काढा.
मुलांना अभ्यासासाठी मोबाईल देण्यापेक्षा तुम्ही त्यांना संगणक किंवा लॅपटॉप देऊ शकता. मुले काय पाहत आहेत आणि काय नाही यावर पालकांनी लक्ष ठेवावे.


























































