कल्याणमध्ये ‘हिंदुहृदयसम्राट श्री’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून कल्याण शहरात भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्याला ‘हिंदुहृदयसम्राट श्री 2026’ या मानाच्या किताबाने गौरवले जाणार आहे. 6 फेब्रुवारी  रोजी सायंकाळी 6 वाजता कल्याण पश्चिम येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे ही स्पर्धा होणार आहे. शिवसेना  उपनेते विजय साळवी यांच्या मार्गदर्शनाने कल्याण शहर शाखेच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनची अधिकृत मान्यता या स्पर्धेस असून जिह्यातील नामांकित शरीरसौष्ठवपटू यात सहभागी होणार आहेत. भव्य व्यासपीठ, आकर्षक पारितोषिके आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे ही स्पर्धा क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरणार असल्याची माहिती उपनेते अल्ताफ शेख, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, कल्याण पश्चिम शहरप्रमुख बाळा परब, कल्याण पश्चिम विधानसभा संघटक किशोर शुक्ला यांनी दिली.