लेखी आश्वासनानंतरच मृतदेह स्विकारणार, मृत पीडितेच्या नातेवाईकांचा पवित्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगणघाट जळीतकांडात पीडित तरुणीचा मृत्यू झाला आहे. दोषीला लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी अशी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची मागणी आहे. सरकारनेही कुटुंबीयांना आश्वासन दिले आहे. तसेच घरातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीचे आश्वासनही सरकारने दिले आहे. परंतु सर्व आश्वासन लेखी स्वरुपात दिले पाहिजे अशी मागणी पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी केली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडित तरुणीच्या वडिलांशी फोनवरून चर्चा केली. तेव्हा मुलाला शासकीय नोकरी देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. परंतु आता मात्र लेखी आश्वास मिळाल्याशिवाय मृतदेह स्विकारणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. तसेच आरोपीला आमच्या ताब्यात द्या त्यालाही तोच त्रास झाला पाहिजे जो तरुणीला झाला अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

तर दुसरीकडे तरुणीच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात कडक पहारा दिला आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे. अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली आहेत.