हिंगोलीत ‘सारी’ने घेतला युवतीचा बळी; घरातील आठ जण आयसोलेशन वॉर्डात

1863

कोरोनाच्या भीतीखाली हिंगोली शहर व जिल्ह्यातील नागरिक असतानाच श्वसन संस्थेतील तीव्र आजार अर्थात सारी (SARI) या आजाराने हिंगोली जिल्ह्यातील एका 19 वर्षीय युवतीचा मृत्यू झाला आहे. या युवतीच्या घरातील आठ जणांना जिल्हा शासकीय रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डामध्ये दाखल करण्यात आले आहे. या आठही जणांच्या लाळेच्या द्रवाचे नमुने घेऊन तपासणीसाठी संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील कोरोनाग्रस्त रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयातल्या आयसोलेशन वॉर्डामध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तर आजवर कोरोनाच्या संशयावरून तपासणी केलेल्या 19 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. तर शासकीय विलगीकरण कक्षामध्ये 10 जणांना ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या