हिंगोलीत दोन एसआरपीएफ जवानांची कोरोनावर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालेगाव येथील बंदोबस्तावरुन परत आल्यावर 21 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आलेल्या सहा जवानांपैकी दोन जवानांनी कोरोनावर मात केली आहे. या दोन जवानांचा 14 दिवसानंतर घेतलेला घशातील लाळेचा नमुना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले.

हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारामधील 194 अधिकारी व जवान मालेगाव व मुंबई येथून बंदोबस्त आटोपून हिंगोलीमध्ये 19 व 20 एप्रिल रोजी परतले होते. या 194 अधिकारी व जवानांच्या घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी सहा जवानांना कोरोणाची लागण झाल्याचे 21 एप्रिल रोजी तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर समोर आले होते. हिंगोलीत सुरुवातीला कोरोना बाधित आढळलेले एसआरपीएफचे सहा जवान मालेगाव येथून आले होते. दरम्यान, सध्या हिंगोली जिल्ह्यात 84 एसएसरपी जवान व अन्य 6 असे 90 रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. यापैकी 5 जवानांवर संभाजीनगरला उपचार सुरू आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात या जवानांवर उपचार सुरू असलेल्या व 21 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या 6 जवानांच्या घशातील लाळेचे नमुने 14 दिवसानंतर घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 2 जवानांचे अहवाल निगेटिव्ह आले असुन त्यांना आज 8 मे रोजी डिस्चार्ज देऊन पुढील 14 दिवसांसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाणार असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दैनिक सामना प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.