
मुंबईत अनेक पुनर्विकासांतर्गत अनेक गृहनिर्माण प्रकल्प रखडले आहेत. त्याचप्रमाणे पंतप्रधान अनुदान प्रकल्पही रखडले आहेत. या प्रकल्पांचे बांधकाम करण्यास जर विकासक असमर्थ असेल तर सरकारने हे प्रकल्प तातडीने ताब्यात घेऊन पुनर्विकास करावा आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी केली.
मुंबईत सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करण्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या 293 च्या प्रस्तावावर बोलताना रवींद्र वायकर म्हणाले, एसआरए प्रकल्पांत अॅनेक्श्चर-2 मुळे मुंबईतील अनेक प्रकल्प रखडले आहेत. ड्रॉप्लरच्या माध्यमातून झोपडपट्टय़ांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले होते. यामुळे प्रत्येक झोपडपट्टय़ांची सीमारेषा निशचित होण्यास मदत होणार होती. त्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले का, झोपडपट्टय़ांचा विभागनिहाय किती एरीआ निश्चित करण्यात आला याची माहिती त्यांनी सभागृहाला विचारली. एसआरए किकसित करताना तेथील जागा रिक्त करण्यासाठी पुरेसे पोलीस बळ उपलब्ध करून दिल्यास एसआरएचा पुनर्विकास झपाटय़ाने होण्यास मदत होईल, अशी सूचना रवींद्र वायकर यांनी केली.
इमारतींच्या गच्चीवर छत घालण्याची परवानगी द्या
मुंबईतील अनेक जुन्या इमारतींमध्ये पावसाळ्यात गळतीची समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून अशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पावसाळ्यात इमारतीच्या गच्चीवर छत घालण्याची परवानगी देण्यात याकी, अशी सूचनाही वायकर यांनी यावेळी केली
एसआरए घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करा
जोगेश्वरीतील हरिनगर तसेच शिवाजी नगर येथील एसआरए पुनर्किकास योजनेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. मुंबईतील झोपडपट्टय़ांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी कडक कायदे तयार करून त्याची कडक अंमलबजाकणी करण्याची सूचना केली. जे लोक झोपडपट्टी वाढवीत असतील त्यांच्यावर
कठोर कारवाई करण्याची मागणी वायकर यांनी केली.




























































