असं झालं तर… गॅस कनेक्शनचा मोबाईल नंबर बदलायचा आहे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 एलपीजी गॅस कनेक्शनशी संबंधित नंबर बंद झाल्यामुळे तुम्हीही सिलिंडर बुक करू शकत नाही. अशावेळी गॅस एजन्सीकडे आपला नंबर अपडेट करावा लागतो.

2 त्यासाठी आपल्याला एजन्सीकडे जाण्याची आणि यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. आपण घरबसल्या ईकेवायसी करून नवीन मोबाईल नंबर जोडू शकतो.

3 गॅस कनेक्शनशी संबंधित नंबर अपडेट करायचा असेल तर MyLPG.in जाऊन आपल्या कंपनीच्या सिलिंडरवर क्लिक करा.

4 यानंतर, कंपनीच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन लॉग इन करा. यानंतर प्रोफाईलमध्ये चेंज मोबाईल नंबरवर क्लिक करून नवीन मोबाईल नंबर टाका.

5 तुमच्या गॅस कंपनीच्या अधिकृत अॅपद्वारेही मोबाईल नंबर अपडेट करता येईल. याशिवाय तुमच्या गॅस एजन्सीच्या व्हॉट्सअॅप नंबरद्वारेही ही प्रक्रिया पूर्ण करता येते.