
मुदत संपलेला गॅस सिलिंडर वापरल्याने गॅसगळती, आग किंवा स्पह्ट यासारख्या गंभीर दुर्घटना होऊ शकतात. त्यामुळे घरातील सिलिंडरची एक्सपायरी जाणून घ्या.
सिलिंडरच्या वरच्या भागात असलेल्या धातूच्या पट्टीवर कोड नंबर असतात. हेच कोड सिलिंडरची मुदत संपण्याची किंवा त्याची चाचणी करण्याची तारीख दर्शवतात.
या सांकेतिक लिपींमध्ये, इंग्रजी अक्षरे महिना किंवा तिमाही दर्शवतात, तर त्यांच्या पाठोपाठ येणारी संख्या वर्ष सूचित करते. त्याप्रमाणे एक्सपायरी चेक करू शकता.
तुमच्या घरी पोहोचवण्यात आलेल्या गॅस सिलिंडरची मुदत संपली असेल तर गॅस एजन्सीला किंवा वितरकाला त्वरित कळवा. सिलिंडर बदलून घ्या.
सिलिंडरच्या वितरणाच्या वेळी त्याचे सील, वजन आणि मुदत समाप्तीची तारीख तपासण्याची सवय लावून घ्या. सील तुटलेले किंवा सैल वाटत असेल तर तो सिलिंडर स्वीकारणे टाळा.





























































