
1 अनेक घरांमध्ये इन्व्हर्टर असतो. अनेकदा त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होत नाही. त्यामुळे ऐन गरजेच्या वेळी इन्व्हर्टर दगा देतो. अशावेळी काही प्राथमिक गोष्टी तुम्हाला तपासता येतात.
2 सर्वप्रथम इन्व्हर्टरचे सर्व फ्यूज तपासून घ्या. खराब झालेले फ्यूज बदलून घ्या. त्यानंतर इन्व्हर्टरच्या सर्व वायर्स तपासून घ्या. एखादी वायर सैल झालेली असू शकते. ते तपासून घ्या.
3 इन्व्हर्टरची बॅटरी अतिशय महत्त्वाची असते. बॅटरीचे टर्मिनल्स तपासून घ्या. ते कोमट पाण्याने स्वच्छ करून घ्या. तेथील वायर सैल असतील तर त्या नीट जोडून घ्या.
4 बॅटरीतील पाण्याची पातळी तपासा. टय़ुब्युलर बॅटरी असेल तर त्यात डिस्टील्ड वॉटर टापून पातळी योग्य प्रमाणावर आणा. बॅटरी खूप जुनी झाली असेल तर ती बदलून नवी बॅटरी घ्या.
5 यानंतरही नीट चार्ंजग होत नसेल तर तंत्रज्ञाला बोलावून अंतर्गत सर्किट, रेक्टिफायर इत्यादी तपासून घ्या. याची दुरुस्ती किंवा बदल, हे तंत्रज्ञाकडूनच करून घ्या.




























































