
धावपळीच्या जीवनात अनेकदा काही कारणांमुळे रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यास उशीर होतो आणि डोळ्यादेखत ट्रेन सुटते. तिकिटाचे पैसे वाया गेले अशी चुटपूट लागते.
रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेन चुकल्यानंतरही तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे परत मिळवू शकता.
तसेच आपली सीट सुरक्षित ठेवू शकता. परताव्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करा.
त्यासाठी टीडीआर ( तिकीट डिपॉझिट रिसीप्ट) दाखल करा.
ट्रेन सुटण्याच्या नियोजित वेळेपासून 1 तासाच्या आत ऑनलाईन/ऑफलाईन टीडीआर फाईल करा.
टीडीआर दाखल केल्यावर रेल्वे प्रशासनाकडून पडताळणी केली जाते आणि त्यानंतर साधारणपणे बेस फेअरच्या 50 टक्के रक्कम परतावा म्हणून मिळू शकते
जर तुम्ही मूळ स्टेशनवर पोहोचू शकला नाही, तर पुढील दोन स्टेशन्सपर्यंत किंवा पुढील एक तासापर्यंत टीटीई तुमची रिकामी सीट इतर कोणालाही देऊ शकत नाही.




























































