हे करून पहा – एसीशिवाय घर थंड ठेवायचंय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नैसर्गिक उपाय करून एसीशिवाय उन्हाळय़ात घर थंड ठेवता येते. दिवसा, विशेषतः दुपारी, खिडक्या, दरवाजे आणि पडदे बंद ठेवा. खिडक्यांवर ओले सुती पडदे टांगल्याने बाहेरून येणारी हवा थंड होऊन आत येते.

स्वयंपाकघरात आणि बाथरूममध्ये एक्झॉस्ट फॅनचा वापर करा, ज्यामुळे उष्णता बाहेर फेकली जाईल. टेबल फॅनसमोर बर्फाचे तुकडे किंवा थंड पाण्याची बादली ठेवा. पंख्याची हवा बर्फावरून आल्यामुळे खोलीत थंड हवा पसरेल.