थंडगार मसाला ताक कसे बनवायचे? हे करून पहा

दुपारी जेवल्यानंतर थंडगार मसाला ताक प्यायला अनेकांना आवडते. हे ताक घरी बनवता येते. सर्वात आधी एक किंवा दोन वाटी दही घ्या. दोन ते तीन कप थंड पाणी, एक चमच भाजलेले जिरे पावडर, चवीनुसार काळे मीठ, एक किंवा दोन हिरवी मिरची, पुदिन्याची पाने घ्या. एका मोठय़ा भांडय़ात दही घ्या. त्यात हे सर्व मिश्रण घाला. त्यात थंड पाणी घाला आणि दही-पाणी मिश्रण एकजीव होईपर्यंत चमच्याने किंवा ब्लेंडरने घुसळा. आता त्यात भाजलेल्या जिऱ्याची पावडर, काळे मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि पुदिन्याची पाने घाला. चवीनुसार लाल तिखट किंवा किसलेले आलेसुद्धा घालू शकता. सर्व साहित्य एकत्र करा. तुमचे मसालेदार ताक तयार आहे. ते थंडगार केल्यानंतर मनसोक्त प्या.