हे करून पहा – नवीन कपड्यांचा रंग न जाण्यासाठी

 सर्वात आधी तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे खरेदी केले आहेत ते पाहा. कपडय़ांचा रंग जाईल असे तुम्हाला वाटत असेल तर कपडे धुण्यासाठी व्हिनेगरचा वापर करा. व्हिनेगरमुळे रंगाचे कण कपडय़ांमध्ये पक्के होतात आणि कपडय़ांचा रंग जात नाही. तसेच कपडे धुताना नेहमी थंड पाण्याचा वापर करा.

 नवीन कपडे धुताना नेहमी सौम्य डिटर्जेंटचा वापर करा. शक्यतो नवीन कपडे हातांनी धुवा, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यास मशीनमध्ये जास्त घर्षण आणि हालचालीमुळे रंग निघून जाण्याची शक्यता असते. कपडे धुताना रंगीत कपडे इतर कपडय़ांसोबत धुणे टाळा. कपडे धुतल्यानंतर ते हवेत वाळत घाला. मशीन ड्रायरमध्ये जास्त उष्णता असल्याने कपडय़ांचा रंग फिका पडू शकतो.