पायाच्या टाचा मऊ करण्यासाठी… हे करून पहा

पायाच्या टाचांची काळजी घेतली नाही तर टाचांना भेगा पडतात. टाचा काळय़ा पडतात. तळपायाप्रमाणे टाचा मऊ करायच्या असतील, घरगुती उपाय जाणून घ्या. सर्वात आधी टाचांची नियमितपणे स्वच्छता करणे गरजेचे आहे. यासाठी टाचा आठवड्यातून दोनदा व्यवस्थित घासणे गरजेचे आहे.

थोडे गरम पाण्यात मीठ आणि थोडे शाम्पू किंवा साबण मिसळून त्यात पंधरा मिनिटे पाय भिजवून ठेवा. नंतर पाय स्वच्छ धुऊन त्यावर मॉइश्चरायझर लावा. रोज रात्री खोबऱयाचे तेल लावले तर याचासुद्धा फायदा होतो. एलोवेरा जेल आणि कोरफड वेरा जेल टाचावर लावा. तांदळाच्या पिठाची पेस्ट दररोज टाचावर लावल्यास टाच मऊ होण्यास मदत मिळते.