
कितीही सुंदर मेकअप केला तरी देखील घामामुळे संपूर्ण मेकअप निघून जातो आणि चेहरा फार वाईट दिसतो. तुम्हीही या समस्येने त्रस्त आहात का? तर आज काही खास गोष्टी सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा मेकअप खराब होणार नाही आणि तुमचा चेहरा देखील सुंदर दिसण्यास मदत होईल. उन्हाळ्यात आपल्या चेहऱ्याची चमक राखणे फार कठीण आहे. कारण कितीही सुंदर मेकअप केला तरी देखील आपल्या घामामुळे चेहऱ्याची चमक निघून जाते. अशावेळी आपण कोणत्या कार्यक्रमाला घरातून मेकअप करुन निघालो तरी कार्यक्रमात पोहोचण्या आधी आपला संपूर्ण चेहऱ्याचा मेकअप निघून जातो.
सनस्क्रीन लावा
तुमचा मेकअप स्वेट प्रूफ करणे फार महत्त्वाचे आहे. अनेकदा असा विचार करतो की मेकअप करताना सनस्क्रीन लावणे गरजेचे नाही. पण, हे चुकीचे आहे. मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याला सनस्क्रीन लावणे फार आवश्यक आहे. सनस्क्रीन लावल्याने तुमची त्वचा उन्हापासून तर वाचेलच आणि तुमचा मेकअपही खराब होणार नाही.
प्राइमर लावणे आवश्यक आहे
उन्हाळ्यात मेकअप लवकर खराब होतो, अशावेळी प्राइमर लावणे फार गरजेचे आहे. प्राइमर लावल्याने तुमचा मेकअप दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. लक्षात ठेवा की तुमचा प्राइमर तेलमुक्त असावा.
लॉंग लास्टिंग फाऊंडेशन
तुमचा लूक अधिक आकर्षित दिसावा याकरता तुमच्या चेहऱ्याला फाऊंडेशन लावणे फार गरजेचे आआहे. हे ३ इन १ लॉंग लास्टिंग फाऊंडेशन निवडा.
सेटिंग पावडरचा करा वापर
मेकअप बेस तयार झाल्यावर पावडर ब्रशने सेट करा, असे केल्याने तुमचा मेकअप ७-८ तास खराब होणार नाही.
जास्त मेकअप करणे टाळा
उन्हाळ्यात मेकअप करण्यात काहीच गैर नाही. पण, ते जपून वापरण्याचा प्रयत्न करा. शिमर उत्पादने आणि हेवी फाऊंडेशनमुळे तुमचा चेहरा सुजलेला वाटू शकतो.






























































