‘दादर कार्निवल’मध्ये हृषीकेशची जादू

महिला उद्योजक आणि कलाकारांना सर्वांगीण व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘दादर कार्निवल’ आयोजित करण्यात आला होता. दोन दिवसांच्या कार्निवलमध्ये हजारो लोक सहभागी झाले.

बॉलीवूड पार्श्वगायक हृषीकेश चुरी यांच्या लाइव्ह परफॉरमन्सने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल हृषीकेश चुरी भारावून गेले. हृषीकेशने अनेक हिंदी आणि मराठी गाण्यांना आपला आवाज दिला आहे. ‘हाऊसफुल 3’ चित्रपटातील ‘टांग उठाके’ आणि ‘तेरा इंतजार’ चित्रपटातील ‘मेहफूज’ ही त्यांची लोकप्रिय गाणी आहेत. झी सारेगमप लिटल चॅम्प्समध्ये ते ग्रँड ज्युरीदेखील होते.