
ऋतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर, कियारा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘वॉर-2’ या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हिंदी आणि तेलुगूमध्ये या चित्रपटाने पहिल्या दिवशी 51.5 कोटी रुपये कमावले तर दुसऱया दिवशी 56.50 कोटी रुपयांची कमाई करत या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये दोन दिवसांत 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे.



























































