
बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर यांचा वॉर-2 हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात सापडला. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात काही बदल सुचवले आहेत. काही डायलॉग्स चुकीचे असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. तसेच चित्रपटातील एक दृश्य निर्मात्याला हटवण्यास सांगितले आहे. सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला यू/ए 16 प्लस हे सर्टिफिकेट देण्यात आले आहे. या चित्रपटातील 9 सेकंदांचा संवेदनशील फुटेज हटवण्याचे आदेश दिले आहेत. हा चित्रपट 14 ऑगस्टला प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटात काटछाट केल्यानंतर हा चित्रपट आता 2 तास 51 मिनिटे 44 सेकंद करण्यात आला आहे.