
सामना ऑनलाईन, मुंबई
बारावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाला असून परीक्षेला बसलेल्या राज्यभरातील 1 लाख 2 हजार 160 विद्यार्थ्यांपैकी केवळ 23 हजार 140 विद्यार्थीच पास झाले आहेत. राज्याच्या निकालाची एकूण टक्केवारी 22.64 इतकी असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल 2.31 टक्क्यांनी घसरला आहे.
सर्वाधिक निकाल लातूर विभागाचा लागला आहे. या विभागातून 5,207 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यांपैकी 1639 विद्यार्थी पास झाले आहेत. तर मुंबई विभागातून परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. परीक्षा दिलेल्या 29 हजार 57 विद्यार्थ्यांपैकी 5600 विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत.
श्रेणीसुधार योजनेची संधी
जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये तसेच त्यापूर्वी झालेल्या बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजने अंतर्गत फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये होणाऱया परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे. परीक्षा अर्ज भरण्याच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत.
- गुणपडताळणीसाठी अर्जाची मुदत – 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर.
- उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी – 27 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर.
- उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.
निकालाची टक्केवारी
- लातूर -31.48
- संभाजीनगर-28.50
- कोल्हापूर-25.94
- नागपूर-25.51
- नाशिक -22.32
- अमरावती-21.44
- पुणे-20.77
- कोकण-19.75
- मुंबई-19.27



























































