
हिंदुस्थानी क्रिकेटमधील वेगवान गोलंदाजीचे अस्त्र असलेल्या मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. मैदानावर भेदक मारा करून प्रतिस्पर्ध्यांच्या दांडय़ा उडवणाऱ्या शमीने शुक्रवारी सोशल मीडियावरून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विशेष म्हणजे, 6 नोव्हेंबर 2013 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या शमीने नेमक्या याच दिवशी 13 वर्षांनंतर कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम दिला. 64 कसोटी सामन्यांत 229 बळी टिपत त्याने हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये आपली वेगळी छाप उमटवली. मात्र, पांढऱ्या जर्सीला रामराम ठोकला असला तरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील त्याचा धडाका कायम राहणार आहे.
‘आज जड अंतःकरणाने आणि असंख्य सुंदर आठवणींसह कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेत आहे. हिंदुस्थानी कसोटी संघाची जर्सी पहिल्यांदा परिधान केली, तेव्हा देशासाठी काहीतरी करून दाखवण्याचे एकच स्वप्न होते, असे त्याने म्हटले.




























































