रामलिंग या वाघाने काल देवळाली पठार भागात शेतकऱ्याची शिकार केल्याचे समोर आल्या नंतर आता वन विभागाकडून ठोस पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे, रामलिंगला जे्रबंद करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवले जाणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
चंद्रपूरच्या अभय आरण्यातून बाहेर पडलेल्या रामलिंगने भटकंती करत थेट मराठवाडा गाठला, लातूर, धाराशिव जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर त्याने काल दुसरी शिकार केली, वन भागात गवत आणण्यासाठी गेलेल्या देवीदास टकले (वय 46) यांच्यावर झडप घालून त्यांना ठार केले. या घटनेने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे, याच रामलिंगने काही दिवसापूर्वी सौताडा येथील देवाच्या घोड्याची शिकार केल्याचा दावा केला जात आहे. या घटनांनी आता शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान आमदार सुरेश धस यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करत रामलिंगला पकडण्याची मागणी केल्यानंतर आता वन विभाग रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याच्या तयारीला लागले आहे. रामलिंगने शंभर किलोमीटरची रेंज ओलांडून देवळाली भागात आपला मुक्काम ठोकल्याने वन विभाग सर्वत्र cctv कॅमेरे, पिंजरे लावण्याच्या तयारीत आहेत. वाघाला पकडे पर्यंत आणि धोका टळेपर्यंत त्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आहे
































































